न्यूयॉर्क
अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये 21 वर्षीय भारतीय वंशाचा विद्यार्थी जूड चॅको याची हत्या करण्यात आली आहे. जूड हा रविवारी स्वत:च्या जॉबवरून घरी परतत असताना चोरी करण्यासाठी आलेल्या 2 जणांनी त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात जूडचा मृत्यू झाला आहे. तर हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. जूडचे आईवडिल 30 वर्षांपूर्वी केरळच्या कोल्लम जिल्ह्यातून अमेरिकेत स्थायिक झाले होते.