प्रतिनिधी / बेळगाव
दी बेळगाव बेकर्स को-ऑप. पेडिट सोसायटीच्यावतीने सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. ताशिलदार गल्ली येथील संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला असून अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंगीरकर होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सचिव सागर शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले.
चेअरमन शिवाजी हंगीरकर यांनी सर्वांचे स्वागत करुन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व्यासपीठावर व्हा. चेअरमन राजाराम सुर्यवंशी, संचालक बसवंत गडकरी, शिवाजी जाधव, विजय पाटील, शंकर पाटीवल, संचालिका सुरेखा मेलगे, कल्पना पावशे आदी होते.
विद्यार्थ्यांनी भावी वाटचाल करताना आपल्या आवडीच्या क्षेत्रात पदार्पण केल्यास मोठे यश मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पालकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत व्हा. चेअरमन राजाराम सुर्यवंशी यांनी क्यक्त केले. सर्वेश पाटील याने बीई इन एरॉनॉटिकल इंजिनिअरींग परीक्षेत 96.20 टक्के तर संचिता चंदगडकर हिने एसएसएलसी परीक्षेत 99.36 टक्के गुण घेतल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
ज्ये÷ संचालक शिवाजीराव जाधव यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यकत केले. विद्यार्थ्यांना रोख पारितोषक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. विनायक सायने यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी व पालकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.