सिंधुदुर्ग प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील सर्व प्रथम वर्षातील व द्वितीय वर्षातील एमबीबीएस ला असलेल्या विद्यार्थ्यांनी दिनांक 31 मे रोजी दाबाची वाडी ओरोस इथे असलेला तलाव परिसर त्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ केला आणि स्वच्छता मोहिमेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग यांच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट मोहिमेला प्रतिसाद देत त्यांच्या समवेत ही स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी हातभार लावला तसेच याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर्स तसेच शिक्षक ,वरिष्ठ निवासी व कनिष्ठ निवासी यांनी सुद्धा उपस्थित राहून परिसर स्वच्छ करण्यास विद्यार्थ्यांची मदत केली. जशी म्हण आहे :एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंथ याच प्रमाणे प्रत्येकाने ठरवले तर कितीही मोठा असलेला अस्वच्छ परिसर हा अगदी थोड्या वेळात सुंदर करता येतो याचे उत्कृष्ट उदाहरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्हा समोर ठेवलेला आहे अशा शब्दसुमनांनी अधिष्ठाता यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व मार्गदर्शनही केले, येणाऱ्या काळामध्ये दरवर्षी 31 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यातील सर्व विद्यार्थी हा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवतील असे आश्वासन अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव आणि सर्व जिल्ह्यातील नागरिकांना यावेळेस दिले आणि तसेच प्रत्येकाने आपला परिसर तरी स्वच्छ राखून त्यांनी निसर्गाचे आपण काही देणे आहोत असे मनात बाळगून जरी काम केले तरी हा जिल्हा स्वच्छतेमध्ये येणाऱ्या काळात प्रथम क्रमांकावर राहील यात मुळी शंका नाही.