क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
गोवा क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या फोंडा तालुका पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेत कुर्टी येथील दादा वैद्य हायस्कूल संघाने यश प्राप्त केले.
17 वर्षांखालील मुलांच्या गटात त्यांना द्वितीय स्थान तर 14 वर्षांखालील मुलींच्या गटात त्यांनी तृतीय स्थान पटकावले. 17 वर्षांखालील संघात विश्वंम गावडे, मयांक गावडे, प्रतिक गावडे, गंधर्व नाईक व गौराक्ष तळवणेकर यांचा सहभाग होता. 14 वर्षांखालील मुलींच्या संघात पूर्वा गावडे, ईश्वरी गावडे, दिव्या गावडे, श्रद्धा गावडे व साधना तंटी यांनी भाग घेतला. यशस्वी खेळाडूंना शारीरिक शिक्षक श्रीकांत फाटक, गजानन पारकर व आनंद कुर्टीकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका स्नेहा पंडित यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन केले.