मूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात : मंडप उभारणीला वेग : बाजारात खरेदीसाठी गर्दी
वार्ताहर /खानापूर
गणेशचतुर्थी अवघ्या 5 दिवसावर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांनी रात्रंदिवस जागून मूर्तीच्या रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात पोचवली आहेत. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडप उभारणीची कामेही आता सुरू होणार आहेत. खानापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आता मंडप उभारणीचे काम सुरू पेले आहे. यंदा कोरोना निर्बंध हटवल्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
खानापूर शहर आणि तालुक्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडप उभारणीलाही वेग आला आहे. खानापूर शहर तसेच ग्रामीण भागात गणेश मूर्तिकार आहेत. त्यापैकी खानापूर, नागुर्डा, गर्लगुंजी, सिंगीनकोप आदी गावातील गणेशमूर्तीना बेळगाव, हुबळी, धारवाड, कारवार भागात बरीच मागणी आहे. यावर्षी बऱयाच मूर्तिकारांनी कोल्हापूरहून मूर्ती मागवल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर भर दिला असून त्याही मूर्तीवर कारागिराकडून शेवटचा हात फिरविला जात आहे.
तालुक्यात सुमारे 800 गणेश मंडळ
तालुक्यात जवळपास 800 गणेश मंडळ आहेत. खानापूर शहर परिसरात 15 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून सर्व मंडळांनी मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे. गणेशोत्सव मंडळांनी मागीलवर्षी घालून दिलेल्या राज्य शासनाच्या मार्गसुचीप्रमाणे 10ƒ12 फूट आकाराचे मंडप उभारले आहेत.
खानापूर शहरात बालमंडळ गणेशोत्सव, व्यापारी मंडळ बाजारपेठ, महाराष्ट्र युवक मंडळ, महालक्ष्मी गणेश मंडळ, चव्हाटा गणेश मंडळ, गणेश युवक मंडळ, चौराशी गणेशोत्सव, रेल्वे स्टेशन विद्यानगर गणेशोत्सव मंडळ, मेदर गल्ली गणेशोत्सव मंडळ तसेच हलकर्णी-गांधीनगर व रुमेवाडी क्रॉस येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे.
गणेशोत्सव काळात चारचाकी वाहनांना बंदी घालण्याची मागणी
विविध आकारातील मकर बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. विविध सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. खानापूर स्टेशनरोडवर विशेषतः राजा शिवछत्रपती चौक ते महाजन खुटापर्यंत बरीच गर्दी असते. गणेशोत्सवाच्या काळात तर वाहने तसेच पादचाऱयांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होत असते. गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने दररोज सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत या रस्त्यावरून चारचाकी वाहनाना बंदी घालून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी केली जात आहे.