दोन हजार किलोमीटरची रेंज, एकाच वेळी शत्रूचे अनेक अ•s उद्ध्वस्त करण्यास सक्षम : नवीन पिढीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
‘अग्नि प्राईम’ची वैशिष्ट्यापूर्णता…
- 11000 किलो क्षेपणास्त्राचे वजन
- 2000 किमी लक्ष्य करण्याची क्षमता
- 34.5 फूट क्षेपणास्त्राची लांबी
वृत्तसंस्था /भुवनेश्वर
भारताने आणखी एक यशस्वी भरारी घेतली आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने ‘अग्नि प्राईम’ या नव्या पिढीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने गुऊवारी जाहीर केले. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 2000 किमी इतकी असून ते एकाचवेळी अनेक लक्ष्ये नष्ट करू शकते. क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी विकास चाचण्यांनंतर ‘अग्नि प्राईम’चे पहिले प्री-इंडक्शन रात्रीचे प्रक्षेपण झाले. अशाप्रकारचे प्रक्षेपण प्रणालीच्या अचूकतेची आणि विश्वासार्हतेची पुष्टी करते. डीआरडीओने बुधवार, 7 जूनच्या रात्री 7:40 वाजता अब्दुल कलाम बेटावरील लाँचिंग कॉम्प्लेक्स 4 वरून अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम यासारखी उपकरणे जहाजांवर उ•ाणाचा डेटा पॅप्चर करण्यासाठी विविध ठिकाणी तैनात करण्यात आली होती. डीआरडीओ आणि स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही चाचणी पाहिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीसाठी डीआरडीओ आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
सशस्त्र दलात सामील होण्याचा मार्ग मोकळा
डीआरडीओ प्रयोगशाळांमधील अधिकारी-शास्त्रज्ञ आणि चाचणीत सहभागी झालेल्यांचे संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी कौतुक केले. तसेच या चाचणीच्या यशानंतर या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा सशस्त्र दलात समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी भारताने 1 जून रोजी अग्नि-1 क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.
एकाचवेळी अनेक स्फोटके डागण्याची क्षमता
‘अग्नि प्राईम’ क्षेपणास्त्र हे अग्नि मालिकेतील नवीन पिढीचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचे वजन 11,000 किलो असून लांबी 34.5 फूट इतकी आहे. या क्षेपणास्त्रावर एकाचवेळी एक किंवा अनेक मल्टिपल इंडिपेंडन्टली टार्गेटेबल रीएंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) म्हणजेच स्फोटके (वॉरहेड्स) बसविण्याची सुविधा आहे. ‘अग्नि प्राईम’ला 4000 किमी रेंजसह अग्नि-4 आणि 5000 किमीच्या श्रेणीसह अग्नि-5 च्या तांत्रिक वैशिष्ट्यांसह डिझाईन केले गेले आहे. त्यामुळे त्याचे तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. नवीन क्षेपणास्त्र वजनाने हलके असून ते मोबाईल लाँचरवरूनही डागता येते. ‘अग्नि प्राईम’ क्षेपणास्त्र द्विस्तरीय यंत्रणेद्वारे चालवले जात असून ते घन इंधनावर आधारित आहे. त्याची मार्गदर्शन प्रणाली इलेक्ट्रोमेपॅनिकल अॅक्ट्युएटर्सने सुसज्ज आहे. ‘अग्नि प्राईम’ केवळ 2000 किमी अंतरावरील शत्रूच्या युद्धनौकांनाच लक्ष्य करू शकत नाही, तर अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम वॉरहेड अधिक धोकादायक बनवते.