डीआरडीओची कामगिरी ः संरक्षण सामर्थ्यात आणखी भर
वृत्तसंस्था / चांदीपूर
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) कमी पल्ल्याच्या शॉर्ट रेंज एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीमचे सलग दोनवेळा यशस्वी परीक्षण पेले आहे. ओडिशाच्या किनाऱयावर चांदीपूरच्या इंटीग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये हे परीक्षण करण्यात आले आहे. उच्च गतीच्या मानवरहित हवाई लक्ष्यांच्या विरोधात हे परीक्षण करण्यात आल्याचे डीआरडीओकडून सांगण्यात आले.
ग्राउंड-बेस्ड मॅन पोर्टेबल लाँचरद्वारे या क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले. यादरम्यान क्षेपणास्त्राने विमानाच्या नजीक येण्याची आणि मागे हटण्याची कामगिरी करून दाखविली आहे. या क्षेपणास्त्र यंत्रणेने मोहिमेच्या सर्व उद्देशांची पूर्तता करत यशस्वीपणे लक्ष्य भेदल्याचे डीआरडीओकडून सांगण्यात आले.
तत्पूर्वी डीआरडीओकडून पीटीओ (पॉवर टेक ऑफ) शाफ्टसंबंधी महत्त्वाचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. विमानाच्या इंजिनमधून गियरबॉक्समध्ये ऊर्जा स्थानांतरित करण्याकरता पीटीओ हे महत्त्वाचे उपकरण मानले जाते. पीटीओ शाफ्टसंबंधी फ्लाइट टेस्ट एलसीए तेजस या विमानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हायस्पीड रोटोर तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून हे परीक्षण डीआरडीओकरता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे. पीटीओ शाफ्ट ही पूर्णपणे स्वदेशात डिझाइन्ड आणि विकसित तंत्रज्ञान आहे. चेन्नईतील कॉम्बॅट व्हेइकल रिसर्च आणि डीआरडीओकडून याची निर्मिती करण्यात आली आहे.
पीटीओ शाफ्ट हा विमानातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भविष्यातील लढाऊ विमाने आणि त्यांच्या निर्मितीतील खर्च तसेच कालावधी कमी करण्यासाठी हे परीक्षण महत्त्वपूर्ण असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ तसेच संबंधित अन्य संस्थेचे अभिनंदन पेले आहे.