बेळगाव – दरवर्षी प्रमाणे बेळगाव तालुक्यातील येळळूर गावची ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्री चांगळेश्वरी देवी विश्वस्त मंडळ व कार्यकारिणीची बैठक मंडळाच्या कार्यालयात नारायण कंग्राळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यात श्री चांगळेश्वरी देवी,श्री कलमेश्वर देवी आणि श्री महालक्ष्मी वाढदिवस व महाराष्ट्र कुस्ती मैदान यावर सविस्तर चर्चा होऊन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरविण्यात आला.सोमवार 10 एप्रिल आंबील गाडे, मंगळवार 11एप्रिल आंबील गाडे,बुधवार 12 एप्रिल श्री महालक्ष्मी वाढदिवस,गुरुवार 13 एप्रिल रोजी महाराष्ट्र कुस्ती मैदान असे ठरवण्यात आले आहे. बैठकीला विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
Previous Article५०० जणातुन वेदांत भोसले ठरला ‘बेस्ट टेन अवॉर्ड’चा मानकरी
Next Article कसबा विधानसभेसाठी मनसेही रिंगणात?
Related Posts
Add A Comment