पत्नीच्या आजारपणातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या
राधानगरी /प्रतिनिधी
राधानगरी पैकी हत्ती महाल येथील वृद्धाने पत्नीच्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केलीय, आज बुधवारी सकाळी 11 च्या दरम्यान घटना उघडकीस आली.त्यांची पत्नी दीर्घकाळापासून आजारी होती.
बळवंत शंकर कानकेकर वय वर्ष 70 असं आत्महत्या केलेल्या वृद्धांच नावं आहे.ते दहा ते बारा वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागातुन सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी दीर्घकाळ आजारी आहेत. तिचं सर्व शुश्रूषा त्यांनाच करावी लागत होती.पत्नीच्या सततच्या आजारपणच्या नैराश्याने सकाळी घरातल्या स्लॅबच्या हुकाला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची वर्दी चुलतभाऊ सदाशिव कानकेकर यांनी दिली, सोळाकुर इथल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार बी डी पाटील,पी डी गुरव यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत. मयत बळवंत कानकेकर यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, एक मुलगा सून, नातवंडे असा परिवार आहे.