26 सप्टेंबरपर्यंत सुनावणी स्थगित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी बीआरएसच्या आमदार के. कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या समन्स विरोधात के. कविता यांच्याकडून दाखल याचिकेवरील सुनावणी 26 सप्टेंबरपर्यंत स्थगित केली आहे. ईडीने 26 सप्टेंबरपर्यंत के. कविता यांच्या विरोधातील समन्स टाळला आहे. के. कविता यांना 26 सप्टेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यासाठी जोर दिला जाणार नसल्याचे ईडीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
ईडीने यापूर्वी मार्च महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांची चौकशी केली होती. या प्रकरणी ईडीने 12 हून अधिक जणांना चौकशीसाठी बोलविले आहे. 20 मार्च रोजी के. कविता यांना ईडीने समन्स बजावला होता. यादरम्यान के. कविता यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने तपास यंत्रणेसमोर हजर होणार नसल्याचे म्हटले होते.