ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील एका कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना खा. सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच तात्काळ आग विझविण्यात आली. सुदैवाने सुळे यांना यात कोणतीही इजा झाली नाही. त्या सुखरूप आहेत.
पुण्याच्या हिंजवडीमध्ये एका कराटे क्लासेसच्या उद्घाटनासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दीपप्रज्वलन करत असताना सुप्रिया सुळेंच्या साडीने पेट घेतला. यावेळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीनं साडीला आग लागल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी तात्काळ साडीची आग विजवण्यात आली. सुदैवाने यात सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. या कार्यक्रमानंतर सुळे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला. जाता-जाता त्यांनी इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं.