प्रतिनिधी/पेडणे
पणजी येथील युवा वर्ग व युवा संस्था, यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ पणजी येथे आयोजित केलेल्या वेशभूषा स्पर्धेत पेडणे येथील सुरेखा किशोर किनळेकर हिला प्रथम पारितोषिक मिळाले .
या स्पर्धेत एकूण तीन गटामधून 200 स्पर्धकांनी भाग घेतला होता . सुरेखा हिला पाच ते दहा वर्षाच्या गटात प्रथम पारितोषिक मिळाले .सुरेखाला उत्कृष्ट असे चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .सुरेखा ही ग्रीनमेडो नागोवा या हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेप्रमाणे विविध स्पर्धेमध्ये ती भाग घेऊन उत्कृष्टरित्या सादरीकरण करत आहे. विविध स्पर्धेमधून पारितोषिक मिळवत आजवर संपूर्ण गोव्यात तसेच पेडण्यात एक उत्कृष्ट बालकलाकार म्हणून ती परिचित आहे. तिच्या ह्या यशा बद्दल करण्याकरिता संपूर्ण पेडण्यात तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.