प्रतिनिधी / बेळगाव :
अवघ्या दोन वर्षांच्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळताच धक्का बसलेल्या पालकांनी सातासमुद्रापार इराकहून बेळगाव गाठले. येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्या चिमुकल्याला जीवदान दिले.
इराकमधील गेथ याच्या जन्मानंतर अवघ्या तीन माहिन्यानंतर त्याच्या हृदयात छिद्र असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याच्या पालकांनी इराकमधील डॉक्टरांची भेट घेऊन गेथच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. यानंतर तेथील डॉक्टरांनी गेथच्या शस्त्रक्रियेसाठी भारत व तुर्की या दोन देशांची नावे सुचविली होती. त्यानंतर गेथच्या पालकांनी भारतची निवड करून डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याकडे शस्त्रक्रिया करवून घेण्याचे ठरविले. यानंतर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी गेथवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले.