तीन दिवसांची पोलीस कोठडी : पणजी पोलिसांनी केली कारवाई
प्रतिनिधी /पणजी
चालकाला मारहाण करून स्पिप्टकार पळविणाऱ्या दोन संशयितांना पणजी पोलासंनी महाराष्ट्रातील इचलकरंजी येथे अटक केली आहे. संशयितांनी चोरलेली जीए-08-व्ही-1150 क्रमांकाची स्विफ्ट कार जप्त केली आहे. सर्व सोपस्कर पूर्ण करून संशयितांना गोव्यात आणले. संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलासांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये निखिल विजय शेट्टी (22 सोलापूर महाराष्ट्र.) वैभव जव्हेरे (23 इचलकरंजे महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. 06 जानेवारी 23 रोजी भादंसं 323, 392 आंतीनियो रॉड्रिग्स (टॅक्सी चालक) यांनी दाखल केलेल्या तक्रारी तक्रारीवरून 5 जानेवारी रोजी संध्याकाळी संशयात मडगाव येथे ट्रक्सी चालकाला भेटेले आणि भाड्याने ड्रक्सी घेतली व मडगवहून फणजीत आले 06 रोजी पहाटे 2.15 च्या सुमारास वृंदावन हॉटेल जवळ पणजी येथे दोन्ही संशdियातांनी तक्रारदाला मारहाण केली व कार घेऊन पसार झाले.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज मिळाले होत. त्यामध्ये गुह्याची घटना कैद झाली होती. सदर फुटेज सर्व आंतरराज्य गुप्तचर स्त्राsतांना पाठवून सतर्क करण्यात आले होते. फुटेजमध्ये कैद करण्यात आलेले संशdियात आणि कार यांची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली.
नंबर प्लेट नसलेली एक माऊती सुझुकी डिझायर पांढऱ्या रंगाची कार सोलापूर परिसरात फिरत असून ही कार गोव्यातून चोरी झाली असण्याची शक्यता आहे. त्वरीत येऊन तपास करावा अशा माहिती सकोला सोलापूर पोलीस स्थानकातून पणजी पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार पणजी पोलीस स्थानकाची एक टीम सोलापूर येथे पाठवण्यात आली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने पणजी पोलिसांच्या पथकाने दोन संशयितांना अटक करण्यात यश मिळविले.
संशयि वैभव जव्हेरे हा सराईत चोरटा असून त्यांनी या अगोदरही दोन दुचाकी चोरल्या होत्या. निखील विजय शेट्टी हा सोलापूर येथे एका हॉटेलात काम करीत होती. त्याच हॉटेलात वैभव जव्हेरेही काम करीत होता. गोव्यातून वाहने चोरण्याचा प्लान केला आणि निखील याला घेऊन तो बस मार्गे गोव्यात आला. त्याच दिवशी त्यांनी मडगाव येथे स्फिट टॅक्सी भाड्याने घेतली आणि पणजीत टॅक्सी चालकाला मारून कार घेऊन पसार झाले होते. झटपट पैसे मिळविण्यासाठी त्यांनी हा सोपा मार्ग पत्करला होता.
एसडीपीओ सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक निखील पालेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, हवालदार नितीन गावकर, कॉन्स्टेबल सायेश उस्कईकर, आदित्य मार्डोळकर, वाहन चालक रामा घाडी, हवालदार हरीश पालेकर, विष्णू राणे व बाप्तीस मास्कारीनेस यांनी ही कारवाई केली आहे.