ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे नेते मोहम्मद फैजल (Mohammad Faisal) यांची रद्द झालेली खासदारकी त्यांना पुन्हा बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.
फैजल हे लक्षद्वीपचे खासदार आहेत. एका प्रकरणात 13 जानेवारीला त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. यानंतर 25 जानेवारीला उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. शिक्षा थांबवल्यानंतर देखील लोकसभा कार्यालयाने त्यांच्या निलंबनाबद्दलचा निर्णय मागे घेतला नव्हता. त्याविरोधात फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल आज येणार होता. यापूर्वीच लोकसभा कार्यालयाने फैजल यांची खासदारकी त्यांना पुन्हा बहाल केली आहे.
अधिक वाचा : पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची पोलिसांकडे मागणी