मालवण प्रतिनिधी
शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो हायस्कुल मधील इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कुमार तन्मय महेश परब याने शहरी सर्वसाधारण विभागात तालुक्यात पाचवा तर जिल्ह्यात ३१ वा क्रमांक पटकावला आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी हायस्कुलने उज्वल यश मिळविले असून या प्रशालेमधील इयत्ता पाचवीचा विध्यार्थी तन्मय परब याने ३०० पैकी २१६ गुण मिळवीत घवघवीत यश संपादन केले. कुमार तन्मय याला प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. अस्मिता वाईरकर, श्रीमती पूनम मेस्त्री, श्रीमती सुनंदा वराडकर, श्री. एस. के. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कु. तन्मय याच्या या यशाबद्दल संस्था चालक तसेच मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.