रोम : डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडची नवोदित इगा स्वायटेक तसेच स्वीसची टिचमन यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवित शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. दरम्यान प्लिस्कोव्हाचे आव्हान संपुष्टात आले.
पोलंडच्या इगा स्वायटेकने इलिना रूसचा 6-3, 6-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अलिकडच्या कालावधीत स्वायटेकने चार स्पर्धा जिंकल्या असून आता तिचे लक्ष प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर आहे. दुसऱया एका सामन्यात स्वीसच्या टिचमनने माजी विजेत्या प्लिस्कोव्हाचा 6-2, 4-6, 6-4 असा पराभव केला. हा सामना जवळपास तीनतास चालला होता. तृतीय मानांकित साबालेन्काने पुढील फेरीत स्थान मिळविताना झेंग शुईचा 6-2, 6-0, अमेरिकेच्या कोको गॉफने आपल्याच देशाच्या बेंगलचा 6-2, 6-4 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.