प्रतिनिधी /राय
कुमटा कर्नाटक येथील श्री सातेरी कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण देवस्थानात उद्या 31 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता ‘स्वराभिषेक’ हा संगिताचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. पं. राम देशपांडे यांचे शिष्य नवेश लोटलीकर हे यावेळी आपली पेशकश सादर करतील.
त्यांना हार्मोनियमवर सुनाद कोरगावकर, तबल्यावर- दत्तात्रय शेटय़े, पखवाजवर किशोर तेली, मंजिरीवर राहुल खांडोळकर साथ करतील. की बोर्डवर युगेंद साळगावकर असतील. मधूर वाणीने प्रेक्षकांना तासनतास एकाच जागी बसवून ठेवण्याची ताकद असलेल्या मानसी वाळवे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार आहेत.