Browsing: #gadget

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिड 19 विषाणूचा प्रसार हवेतून होत असल्याच्या शास्रज्ञांच्या अभ्यासावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर भवतालची हवा विषाणूमुक्त करण्यासाठी अनेक उपकरणे विकसित होऊ लागली. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे आयआयटी, कानपूरच्या इमेजरी विभागाने एक स्वदेशी डिव्हाईसची निर्मिती केली आहे. त्याच्या मदतीने 15 मिनिटात दहा फुटाची खोली विषाणूमुक्त करता येऊ शकते. हे एक स्मार्टफोन संचलित हँडी अल्ट्राव्हायोलेट डिसइन्फेक्शन हेल्पर असून या यंत्राच्या मदतीने लोक आपल्या आजूबाजूचे वातावरण विषाणुमुक्त करू शकतात.  शुद्ध यंत्राच्या मदतीने हॉटेल, मॉल, शाळा, ऑफिस, घर आदी ठिकाणची हवा कोरोनासह अन्य विषाणूंच्या संसर्गापासून मुक्त करता येऊ शकते.  शुद्ध डिव्हाईस वापरण्यासही सुलभ आहे. या यंत्रामध्ये 15 वॅटचे सहा अल्ट्राव्हायोलेट लाईटस असून ते लांबून नियंत्रित करता येऊ शकतात.  एक अँड्रॉईड ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून स्मार्टफोनच्या मदतीने शुद्ध हे यंत्र चालू अथवा बंद करता येते. तसेच त्याची गती आणि जागा देखील नियंत्रित करता येऊ शकते.