एसीएफ संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : खोटी माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल
बेळगाव : समाज माध्यम तसेच बोगस अॅपच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. बँक खात्यामधील पैसेही लुटण्यात येत आहेत. अशा अॅप्सवर तसेच फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन एसीएफ कर्नाटक संघटनेतर्फे जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. समाज माध्यमांवर खोटी माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. या माध्यमातून संपर्क साधून संबंधित नागरिकांचे मोबाईल नंबर घेऊन हॅक केले जात आहेत. वेगवेगळी आमिषे दाखवून बँक खात्यांची व इतर गुप्त माहिती मिळवून आर्थिक लूट केली जात आहे, असे प्रकार वाढीस लागले आहेत. यावर त्वरित आळा घालण्याची नितांत आवश्यकता आहे.
नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मागणी
आंतरराष्ट्रीय कॉल करून असलेली व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू आहेत अशा प्रकारे नागरिकांना ब्लॅक मेल करणारे व मोबाईल हॅक करून लूट करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी एसीएफ संघटनेकडून सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.