न्हावेली / वार्ताहर
तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून कु . सुहानी महादेव गावडे ९३टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला कु. विशाखा विजय परब ८७.८० टक्के गुण मिळवून व्दितीय कु. चित्रांग श्रीकृष्ण मालवणकर ८७.८० टक्के गुण मिळवून तृतीय आला. तर कु .मोहन अविनाश गावडे ८६.२० टक्के गुण मिळवून चौथा आला . सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था अध्यक्ष विष्णु पेडणेकर , सीईओ श्रीकृष्ण पेडणेकर , खजिनदार डॅा . भालचंद्र कांडरकर मुख्याध्यापक प्रतापराव देसाई पर्यवेक्षक बांगर तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले .