पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेत्री
एक रात्र, एक परिवार, अनेक मृत्यू, एक तपास अधिकारी आणि अनेक शक्यता! अशी कॅप्शन देत डिस्ने प्लस हॉटस्टारने सत्यघटनांवर प्रेरित ‘आखिरी सच’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. निर्विकार फिल्म्सकडून निर्मित आणि रॉबी ग्रेवालकडून दिग्दर्शित ‘आखिरी सच’ ही सीरिज 25 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये तमन्ना भाटिया, अभिषेक बॅनर्जी, शिविन नारंग, दानिश इक्बाल, निशु दीक्षित, कृति विज आणि संजीव चोप्रा यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. ‘आखिरी सच’ या सीरिजची कहाणी अत्यंत संवेदनशील आहे. ही सीरिज पोलिसांच्या दृष्टीकोनातून अवघड प्रकरणाची कहाणी दर्शविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही सीरिज एका सत्यघटनेवर प्रेरित असली तरीही यात अनेक काल्पनिक भाग जोडण्यात आले आहेत असे दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल यांनी सांगितले आहे. या सीरिजमध्ये अन्या नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तमन्ना भाटिया दिसून येणार आहे. ‘आखिरी सच’ची कहाणी वाचून झाल्यावर मी थक्क झाले होते. ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी अत्यंत खास आहे. मी पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असल्याचे तमन्नाने म्हटले आहे. आखिरी सच या सीरिजमध्ये भुवन ही व्यक्तिरेखा मी साकारत आहे. आखिरी सच मानवी मनाच्या सर्वात दडलेल्या हिस्स्याला स्पर्श करते. या भूमिकेसाठी मी पूर्वीपासून उत्सुक होतो. प्रेक्षक या सीरिजला मोठी पसंती देतील असे माझे मानणे असल्याचे अभिषेक बॅनर्जीने म्हटले आहे.