राज्य मानांकीत टेबल टेनिस स्पर्धा
बेळगाव : बेंगळूर येथे एम. एस. रामय्या राज्यस्तरीय मानांकीत टेबल टेनिस स्पर्धेत 13 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तमोघना व मुलींमध्ये तनिष्का काळभैरव यांनी विजेतेपद पटकाविले. बेंगळुर येथे मल्लेश्वरम टेबल टेनिस संघटना आयोजित मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्यफेरीच्या सामन्यात रियान्स विजयी वि. वेदांत कशिष्ट 11-6, 11-3, 11-7 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या सामन्यात तमोघना विजयी वि. अभिनव प्रसन्ना 11-5, 6-11, 11-3, 11-8 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तमोघना एम.ने रियांश जलानचा 15-13, 11-7, 6-11, 11-8 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात बेळगावच्या तनिष्का काळभैरव विजयी वि. अण्णा सुभाष 11-4, 11-1, 11-3, तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात अनिता विजयी वि. राशी राव 12-10, 9-11, 11-9, 5-11, 11-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तनिष्काने अनितीचा 11-1, 11-9, 11-6 अशा सरळ गुणफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर मान्यवरांच्याहस्ते तनिष्का कपिल काळभैरव व अमोघ यांना चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.