मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सचा समभाग सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजीत असताना दिसला. सदरची तेजी ही टाटा समूहाने अलीकडेच गुजरात राज्य सरकारसोबत ईव्ही बॅटरी निर्मितीसाठी करार केल्याच्या बातमीमुळे आली असल्याचे समजते. टाटा मोटर्सचा समभाग शेअरबाजारात सोमवारी 1 टक्का वाढत 542 रुपयांवर इंट्रा डे दरम्dयान कार्यरत होता. याआधी या समभागाने 15 मे 2023 रोजी 537 रुपयांचा उच्चांकी भाव गाठला होता.