वृत्तसंस्था/ कोलंबो
आशिया चषक स्पर्धेसाठी बुधवारी दुपारी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. बेंगळूर येथील एनसीएमध्ये टीम इंडियाच्या शिलेदारांनी आठवडाभर तयारी केली. यानंतर संपूर्ण संघश्रीलंकेसाठी रवाना झाला. केएल राहुल पहिल्या दोन सामन्यामध्ये खेळणार नसून तो बेंगळूरमध्येच आहेत. विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह संघातील सर्वच सहकारी श्रीलंकेत पोहचले आहे. दरम्यान, श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर तिलक वर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. आशिया चषकामध्ये टीम इंडियाचा पहिला सामना शनिवारी पारंपारिक पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. याआधी भारतीय संघ दोन दिवस सराव करणार आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर, दुखापतीमुळे दोन सामन्याला मुकणार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव).