मुत्रपिंड प्रत्त्यारोपणासाठी हवेत 15 लाख
पेडणे : पेडणे तालुक्मयात मांद्रे मतदारसंघात तुये पंचायत क्षेत्रातील सोणये- पालये येथील पेडणेकर कुटुंबातील कु. तेजल मनोहर पेडणेकर (30 ही वर्षिय युवती मुत्रपिंड अर्थात किडनी निकामी होण्याच्या आजाराने ग्रस्त आहे. कु. तेजल पेडणेकर हीचा जीव वाचवण्यासाठी पेडणेकर कुटुंबाची धडपड सुरू आहे. डॉक्टरांनी केलेल्या निदानानुसार हा आजार सीकेडी स्टेज-5 वर पोहचला आहे. सध्या तिच्यावर हेमो डायलेसीसचा उपचार सुरू आहे. तिचे स्वास्थ्य स्थिर ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा हेमोडायलेसीसची गरज पडत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तात्काळ किडनी प्रत्यारोपणाची शिफारस करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी आणि तत्संबंधी औषधोपचारासाठी किमान 15 लाख रूपयांची गरज भासणार आहे. वरिष्ठ सल्लागार नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. शीतल लिंगडे हे कु. तेजल पेडणेकर हीच्यावर उपचार करत आहे.
सोणये- पालये येथील पेडणेकर हे एक गरीब शेतकरी कुटुंब आहे. कु. तेजल पेडणेकर हीचे वडिल मनोहर पेडणेकर हे सध्या तुये पंचायतीचे पंचसदस्य आहेत. मनोहर पेडणेकर यांना सात मुली आहेत. या सर्वांना आपल्यापरीने त्यांनी चांगले शिक्षण दिले आहे. कु. तेजलच्या आजारपणामुळे या कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे. आत्तापर्यंत कु. तेजलच्या या आजाराचे झालेले निदान, तसेच आत्तापर्यंतचा औषधोपचार आणि डायलेसीसचा खर्च वेगवेगळ्या पद्धतीने हीतचिंतक, नातेवाईकांकडून तसेच कु. तेजलच्या इतर बहिणींनी पुढाकार घेऊन केला परंतु किडनी प्रत्यारोपणासाठी मात्र मोठा खर्च येणार असल्याने तो कसा उभारणार या चिंतेने हे कुटुंब त्रस्त आहे.
कु. तेजल पेडणेकर हीची आई गुणवंती पेडणेकर हीने आपल्या मुलीला किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे. ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर होणे गरजेची आहे, असे डॉक्टरने कळवले आहे. कु. तेजलच्या उपचारांसाठी नागरिकांनी सढळहस्ते मदत करावी जेणेकरून किडनी प्रत्यारोपणातून तीला नवजीवन प्राप्त होऊ शकेल आणि ती पुन्हा नव्या उमेदीने आपले जीवन जगू शकेल. कु. तेजल पेडणेकर हीला मदत करण्यासाठी आपण खालील पत्त्यावर थेट मदत पाठवू शकतात. यासंबंधी आपण मोबाईल नंबर- 9823890505 इथे संपर्क करू शकतात.
KUM. TEJAL MANOHAR PEDNEKAR
BANK-BANK OF INDIA
BRANCH- SALIGAO
ACCOUNT NO- 101010110007204
IFSC CODE-BKID0001010