प्रतिनिधी /बेळगाव
दहावीची पुरवणी परीक्षा दि. 27 जून ते 4 जुलै या दरम्यान होणार आहे. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांना या परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे.
दोन वर्षांनंतर परीक्षा मंडळाने नियमित पद्धतीने परीक्षा घेतल्या. या परीक्षेत काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या पद्धतीने मुख्य परीक्षा पार पडली, त्याच पद्धतीने पुरवणी परीक्षाही घेतली जाणार
आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
- 27 जून- विज्ञान, राज्यशास्त्र, कर्नाटक संगीत.
- 28 जून प्रथम भाषा-कन्नड, तेलगू, हिंदी, मराठी, तमिळ, उर्दू, इंग्रजी व संस्कृत.
- 29 जून- द्वितीय भाषा-इंग्रजी, कन्नड.
- 30 जून- समाज विज्ञान.
- 1 जुलै– तृतीय भाषा-हिंदी, कन्नड, इंग्रजी, अरेबिक, उर्दू, संस्कृत, कोकणी,तुळू
- 4 जुलै– गणित