जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
हंगरगा येथील गायरान जागा ही गावासाठी राखीव होती. मात्र त्या जमिनीमध्ये काहीजण अतिक्रमण करत आहेत. तेंव्हा ते अतिक्रमण हटवून गावच्या लोकांना गायरान म्हणून राखीव ठेवावी. याचबरोबर सर्व्हे क्रमांक 20 मध्ये उद्यान तसेच इतर योजना राबविण्यासाठी ती जमीन देखील ग्राम पंचायतीच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी हंगरगा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हंगरगा गावची सदर जमीन ही डोंगराच्या बाजुला आहे. 240 सर्व्हे क्रमांक असून सदर जमिनीमध्ये अतिक्रमण करण्यात येत आहे. तेंव्हा महसूल विभागाने त्याचा सर्व्हे करून ती सर्व जमीन गावासाठी राखीव ठेवावी. सर्व्हे क्रमांक 20 मध्ये गटारीचे तसेच इतर पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे त्या परिसरातील शेतीला मोठा फटका बसत आहे. तेंव्हा सदर जमीन ही उद्यान किंवा इतर कामांसाठी वापर करणे महत्त्वाचे आहे. तेंव्हा जमीनदेखील ग्राम पंचायतकडे द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर निनाथ सावगांवकर, कृष्णा हुंदरे, प्रशांत सोनोलकर, मल्लेश बेळगावकर, अमित पाटील, महेश चलवेटकर, शाम लोहार, जोतिबा चलवेटकर, कल्लाप्पा सावंत, गावडू पाटील, नारायण पाटील, ओमकार गोडसे यांच्या स्वाक्षऱया आहेत. यावेळी इतर ग्रामस्थ उपस्थित होते.