लंडन / वृत्तसंस्था
प्रीमियर लीग कार्यकारिणीने चेल्सी फुटबॉल क्लबच्या हस्तांतरणाला मान्यता दिली. टॉड बोहली-क्लियर्लके कन्झोर्टियम सदर क्लबची खरेदी करणार आहे. अद्याप हा व्यवहार पूर्ण होण्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून विक्री परवाना मिळण्याचीही आवश्यकता असणार आहे. क्लब खरेदीकरिता पुढाकार घेत असलेल्या कन्झोर्टियम सदस्य क्लियर्लके कॅपिटल ग्रूपशी संलग्न आहेत. या समुहात टॉड बोहली, हॅन्सजॉर्ग विस व मार्क वेल्टर यांचा समावेश आहे. चेल्सी एफसी आता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले अन्य प्रशासकीय परवाने मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत आहेत.