बेळगाव / प्रतिनिधी
आमदार अनिल बेनके पुरस्कृत दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत भव्य आंतरराज्य ढोलताशा वादन स्पर्धेच्या दुसऱया दिवशी शनिवारी उत्साहात सादरीकरण झाले. तीन दिवस चालणाऱया या स्पर्धेत आज दुसऱया दिवशी तब्बल नऊ ढोलताशा पथकांचे सादरीकरण झाले. शिवमूद्रा ढोलताशा ध्वजपथक कडोली बेळगाव यांच्या सादरीकरणाने स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. खेळीमेळीच्या वातावरणात अत्यंत चुरशीने ढोलताशा वादणाचे प्रदर्शन केल्याने बेळगावकरांना पारंपारिक वाद्यांची मेजवानी मिळाली.
स्पर्धेच्या दुसऱया दिवशी शिवमुद्रा ढोलताशा ध्वजपथक कडोली, शिवशंभो ढोलताशा पथक हलगा, रावण वाद्यपथक बिच्चूगल्ली शहापूर, श्री मोरया ढोलताशा पथक बेळगाव, जयशिवराय पुरस्कृत आराध्य ढोलताशा पथक बेळगाव, बाप्पा ढोलताशा पथक बेळगाव, रूद्रताल ढोलताशा पथक बेळगाव, एकदंत ढोलताशापथक बेळगाव, शिवगर्जना ढोलताशा पथक या ढोलताशा पथकांच्या वादनाने परिसर दणाणून निघाला. प्रेक्षकांच्या गर्दीने सरदार मैदान तुडूंब भरले होते. सदर स्पर्धेचे परिक्षण पुजा मल्लीगे घोडके, दीपेन मालवडे, प्रथमेश धुमाळ, सौरभ साळुंखे यांनी केले.
पुणे येथून बेळगाव येथे आल्यानंतर बेळगावचे वातावरण प्रसन्न करणारे आहे. बेळगाव हे थंडगार व सुंदर ठिकाण आहे. स्पर्धेतील वाद्य पथके हे उत्कृ÷ आहेत. पथकाचे वादन बघुन मी भारावून गेले आहे.
– प्रसिद्ध ढोलताशा पथक वादक पूजा मल्लीगे घोडके