कोकणसाठी गणेशोत्सव खूप महत्त्वाचा सण आहे. या उत्सवाच्या पाठीमागे मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा जपण्यासाठी स्थानिक लोक त्यासोबत चाकरमानी आघाडीवर असतील. उत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणेच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव सारख्या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या मूळ घरी येत असतात. काही लोक काम, उद्योगाच्या निमित्ताने राज्याबाहेर देखील जाऊन राहिले आहेत. ही मंडळीदेखील उत्सवाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी येत असतात. प्रचंड उत्साहात साजरा होणाऱ्या या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रशासनाने त्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली असली तरी अनेक आघाड्यांवर व्यवस्था अपुरी पडते आणि लोक मोठ्या प्रमाणात अवस्थेला सामोरे जात आहेत असे क्षेत्र वारंवार दिसून येते.
रत्नागिरी, सिंधुदुर्गात मिळून 20 लाखांहून अधिक लोक या उत्सवासाठी येत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या लाखो लोकांना सामावून घेण्यासाठी स्थानिक व्यवस्था पुरेशा आहेत मात्र प्रवासाची साधने व अन्य व्यवस्था यांच्यावर कमालीचा ताण येत असतो. हा ताण कमी होण्यासाठी योजना आखली गेली तरी प्रतिवर्षी ती कमी पडते.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाचा आढावा घेतला असता रत्नागिरी जिह्यात 13 लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, शहरांमध्ये होणारी गर्दी तसेच या गर्दीमुळे येणारे अनेक साथीचे रोग यासंदर्भात प्रशासन सज्ज झाले आहे. सुरक्षित व शांततापूर्ण गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिह्यात जड व अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. 5 सप्टेंबर रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जड व अवजड वाहतूक बंद करण्यात आली. यात दूध पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, वैद्यकीय सुविधा अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना हा आदेश लागू राहणार नाही.
गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन व सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी एकूण 108 मोटरसायकल तसेच 96 चारचाकी वाहनांचा बंदोबस्तात वापर होणार आहे. बंद रस्ते, वळणे आणि पार्किंग व्यवस्थापन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर वेगवेगळ्dया टप्प्यावरील एकूण 6464 कि.मी. रस्त्याच्या दुऊस्तीचे आकलन करण्यात आले आहे. प्रमुख घाटांमध्ये तसेच महामार्गावर वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक पोलीस अंमलदार यांचा प्रभावी वापर होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर एकूण 3 तपासणी नाका व नागरिकांच्या मदतीसाठी 15 पेंडॉल उभारण्यात आले आहेत. रत्नागिरीमध्ये नियमित येणाऱ्या-जाणाऱ्या 33 रेल्वेगाड्या व जादा सोडण्यात येणाऱ्या 25 एसटी बससारख्या सेवांचे अद्ययावत वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सणादरम्यान प्रवासी नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सहाय्य पुरवणार आहे. रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पेंडॉल ठिकाणी मोफत चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या मुख्य प्रवेश बिंदूवर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवली आहे.
या काळात साथीच्या आजारांचा परगावाहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या आगमनामुळे फैलाव होण्याची शक्यता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य उपचार देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्dयात आरोग्य पथके तैनात केली आहेत. या पथकामांर्फत गावी येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू झाली आहे. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात डेंगू, डोळे येणे असे ऊग्ण आढळत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गावी येणाऱ्या नागरिकांमुळे आजारांचे प्रमाण वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्dयातील बसस्थानक, रेल्वेस्थानक व महामार्गावर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्याद्वारे चाकरमान्यांची तपासणी व त्यांना प्रतिबंधात्मक उपचार, तसेच खबरदारीविषयी मागदर्शन करण्यात येत आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात ताप, काविळ, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया ऊग्ण आढळल्यास औषधोपचार करण्यात येणार आहेत. महामार्गावर 108 क्रमांकाच्या ऊग्णवाहिका त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहणार आहेत. तसेच गणेशभक्तांना वैद्यकीय सेवेची कुठेही कमतरता भासणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाकडून घेण्यात येऊन औषधांचा साठाही पुरेसा ठेवला गेला आहे.
सिंधुदुर्ग जिह्यातही अशाचप्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. राजकीय पक्षांचे चाकरमानी व्यवस्थेकडे अधिक संवेदनशीलतेने पाहत आहेत. आगामी काळात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन जनसंपर्क वाढवण्यासाठी गणेशोत्सवामध्ये ही राजकीय मंडळी अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य, कोकण व पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या गणपती स्पेशलसह दिवा-रत्नागिरी, दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशलसह लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ अनारक्षित स्पेशलसह अन्य गणपती स्पेशल गाड्या कोकण मार्गावर विक्रमी गर्दीनेच धावत आहेत. रेल्वेगाड्यांना होणाऱ्या गर्दीमुळे आतमध्ये प्रवेश मिळवताना चाकरमान्यांची चांगलीच दमछाक होत आहे. एकीकडे चाकरमान्यांचा रेटारेटीचा प्रवास सुरू झालेला असतानाच त्यात रेल्वेगाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाचाही चाकरमान्यांना फटका बसत आहे.
चिपळूण शहरात गणेशोत्सवासाठी वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. तथापि गुहागर तालुका तसेच चिपळूणच्या पश्चिम भागात जाणारी अनेक वाहने गुहागर बायपासचा वापर न करता बाजारपेठेतून गाड्या हाकत असल्याने वाहतुकीची कमालीची कोंडी होत आहे. योग्य नियोजन होत नसल्याने बाजारपेठेत आलेले सामान्य लोक या कोंडीत सापडले आहेत. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथील शास्त्राrपुलानजीक अनेक जागांवर वाहतूक कोंडी झाली. यामुळे प्रवासी हैराण झाले होते. महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ देणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे लोकांच्या अनुभवास न आल्याने प्रवासी वर्ग हैराण झाला होता. त्यापुढे आणखी आठवडाभराने चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतील त्यावेळी अधिक सुनियोजित वाहतूक व्यवस्था दिसून यावी अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
सुकांत चक्रदेव