भारतात मॉल संस्कृती नवी नाही. अमेरिकेतून पोहोचलेल्या या ट्रेंडने भारतात इतक्या वेगाने हातपाय फैलावले आहेत की, आता टीयर-2 शहरांमध्येही मॉल दिसून येतात. मुंबई, दिल्ली, नोएडा, चेन्नई यासारख्या शहरांमध्ये अनेक मोठे मॉल आहेत. परंतु जगातील सर्वात मोठा मॉल कुठे आहे याची कल्पना आहे का? हा मॉल अमेरिकेत असेल असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु प्रत्यक्षात इराणमध्ये जगातील सर्वात मोठा मॉल आहे.
तेहरानमध्ये जगातील सर्वात मोठा मॉल आहे. हा मॉल इतका मोठा आहे की तो एक दिवसात पूर्ण पाहणे शक्य होत नाही. हा 7 मजली असून त्याचा आकार 1.35 दशलक्ष चौरस मीटरपेक्षा अधिक आहे. 2014 पासून याची निर्मिती होत आहे. याच्या निर्मितीत 1200 कंत्राटदार आणि 25 हजार कामगारांचे योगदान आहे. 2018 मध्ये या मॉलचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता आणि 2,67,000 चौरस मीटरचे क्षेत्र भाडेतत्वावर देण्यासाठी एरिया आणि 708 रिटेल युनिक सुरू करण्यात आले होते. त्याचवर्षी या मॉलने स्वत:च्या नावावर एक विक्रम केला होता.
या मॉलमध्ये 700 दुकाने असून यात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड सहजपणे मिळतात. या मॉलमध्ये 12 आयमॅक्स सिनेमा आहेत. एक थिएटर हॉल असून यात 2 हजार लोकांना सामावण्याची क्षमता आहे. येथे संग्रहालयदेखील असून यात अम्यूजमेंट पार्क, रुफटॉफ टेनिस कोर्ट, कन्व्हेंशन सेंटर आणि हॉटेल आहे. या मॉलमध्ये मिरर हॉल असून यात काचेचे 3 कोटीहून अधिक तुकडे आहेत. येथे वाचनालय असून यात 45 हजारांहून अधिक पुस्तके आहेत.