ऍक्शन-थ्रिलर हॉलिवूडपटात दाक्षिणात्य स्टार
दक्षिणेचा सुपरस्टार धनुषने दक्षिणेच्या चित्रपटांमधील स्वतःची जादू यापूर्वीच दाखविली आहे. याचबरोबर त्याने हिंदी चित्रपटांमध्येही स्वतःचा ठसा उमटविला आहे. अभिनेता आता हॉलिवूडमध्ये स्वतःचा प्रवेश करणार आहे. धनुष नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रे मॅन’मधून हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. याच नावाने मार्क ग्रेनी यांच्या 2009 मधील कादंबरीवर आधारित चित्रपटाला ऍक्शन-थ्रिलरचे स्वरुप देण्यात आले आहे.
अँथोनी आणि जो रुसो यांच्याकडून दिग्दर्शित ‘द ग्रे मॅन’मधील धनुषचा फस्टं लुक शेअर करण्यात आला आहे. चित्रपटात रयान गोसलिंग, क्रिस इवांस, एना डी अरमास, रेगे-जीन पेज, जेसिका हेनविक, बिली बॉब, थॉर्नटन आणि वॅगनर मौरा देखील आहे.
या चित्रपटाची कहाणी मारेकरी आणि माजी सीआयए ऑपरेटिव्ह कोर्ट जेंट्री या व्यक्तिरेखांच्या भोवती घुटमळणारी आहे. सीआयए ऑपरेटिव्हची भूमिका रयानने साकारली आहे. धनुष यापूर्वी अतरंगी रे या चित्रपटात दिसून आला होता.