सर्व मुख्य रस्त्यांवरची गटारे उसपली : पालिकेला भुर्दंड : साबांखाकडून कोणतेही सहकार्य नाही
प्रतिनिधी /डिचोली
राज्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या सर्व गटरांची जबाबदारी ही वास्तविक सार्वजनिक बांधकाम खात्याची असते परंतु, डिचोली नगरपालिका क्षेत्रातील सर्व गटरांची जबाबदारी ही नगरपालिकेच्याच माथी आली आहे. सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून पालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांच्या कडेची गटारे पालिकेने आपल्या खर्चाने उपसून साफ केली आहेत. यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे पालिकेला कोणतेही सहकार्य लाभले नाही.
पावसाळा जवळ आल्यानंतर गटार सफाईची जबाबदारी कोणाची यामुद्दय़ावरून दरवषी संभ्रम असतोच. पालिका क्षेत्रातील सर्व चौदाही प्रभागातील गटरांची साफसफाई करते. त्यासाठी विशेष अतिरिक्त कामगार व निधीची तरतूद केली जाते. यावषी सुमारे सहा लाख रूपये खर्चून पालिकेने डिचोली पालिका क्षेत्रातील सर्व गटारे वेळे अगोदरच साफ केली आहे. या कामांमध्येच पालिकेला सर्व मुख्य रस्त्यांवरील गटरे साफ करण्याची कामे करून घ्यावी लागली.
व्हाळशी ते मुस्लीमवाडा डिचोली या मार्गावरील गटारे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आखत्यारीत आहेत. परंतु, ती हल्लीच्या काळात खात्यातर्फे साफ केली जात नाहीत. पूर्वी सदर गटार खात्यातर्फे कामगार घालून साफ करण्यात येत होती. त्यानंतर खात्यातर्फे पालिका तसेच पंचायतींना सूचना देऊन मुख्य रस्त्यांवरील गटरे साफ करण्याची सूचना देण्यात आली. व या कामाचे पैसे खात्यातर्फे संबंधित पालिका, पंचायतीला देण्याचे ठरविण्यात आले होते. काही वर्षे ही व्यवस्था चालली, मात्र अलिकडे ही व्यवस्थाच बंद झाली.
त्यानंतर सदर गटार साफसफाईबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला संबंधित पालिका किंवा पंचायतीतर्फे पत्र लिहिल्यास, खात्याकडे या कामासाठी कामगार तसेच निधीही नसल्याची उत्तरे पालिकेला उत्तर आली आहेत. त्यामुळे खात्यावर आवलंबून न राहता केवळ लोकांना पावसाळय़ात पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी पालिकेने स्वतः सामाजिक कर्तव्याचे भान राखून स्वनिधीतून सर्व मुख्य रस्त्यांवरील गटरे साफ केली.
पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधील गटरांची साफसफाई झाल्यानंतर या कामाला पालिकेने हात घातला होता. हे काम आता जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. दरवषीप्रमाणे यंदाही जबाबदारी डिचोली नगरपालिकेलाच स्वीकारावी लागली. व त्याचा आर्थिक भुर्दंड मात्र पालिकेला सोसावा लागला.