मडगावच्या सरकारी वकिलांची सत्र न्यायालयास विनंती
मडगाव : लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी बाबुश मोन्सेरात यांच्या विऊद्धचा खटला महिला न्यायाधिशांच्या न्यायालयात वर्ग करण्याची विनंती सरकारी वकिलानी शुक्रवारी मडगावच्या न्यायालयाकडे केली आहे. मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्यासंबंधातील हा खटला मडगावचे मुख्य सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांच्या न्यायालयात चालू आहे. शुक्रवारी या खटल्याची सुनावणी सुऊ झाली तेव्हा सरकारी वकील व्ही. जे. कॉश्ता यांनी लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा खटला महिला न्यायाधीश असलेल्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावा, अशी विनंती न्या. आगा यांच्या न्यायालयाकडे केली.
सरकारी आदेशानुसार खटला आला मडगावात
लैंगिक अत्याचारची ही कथित घटना 2016 साली घडली होती. संशयित आरोपी मोन्सेरात यांनी गुंगीचे औषध पाजून आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असा आरोप एका अल्पवयीन मुलीने केला आहे. हा खटला उत्तर गोव्यातील न्यायालयात चालू होता. मात्र सरकारने राजकारण्यांविऊद्ध असलेले खटले मडगावच्या मुख्य सत्र न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार हा खटला न्या. आगा यांच्या न्यायालयाकडे आला होता. सरकारी वकील कॉश्ता यांनी लैंगिक अत्याचारासंबंधातील खटले महिला न्यायाधीश हाताळतात, अशी तरतूद कायद्यात असल्यामुळे हा खटलाही एखाद्या महिला न्यायाधिशांच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावा, असे मत मांडले. न्या. आगा यांचे न्यायालय या अर्जावर पुढील सुनावणीच्यावेळी आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.