महानगरपालिका लक्ष देणार का?: दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : आरटीओ ते किल्ला तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून शिवाजीनगर पाचवा क्रॉसकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सीडीला भगदाड पडले आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी लहान-मोठे अपघात घडत आहेत. काही पादचारी त्यामध्ये पडून जखमी झाले आहेत. तेव्हा तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. शिवाजीनगर येथील पाचव्या क्रॉसवर अलीकडेच सीडीचे काम करण्यात आले होते. मात्र काही दिवसातच त्यावरील काँक्रिट खराब झाले आहे. मोठे भगदाड पडले असून अपघात घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रात्रीच्यावेळी ये-जा करणेदेखील कठीण असून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.