नवी दिल्ली
पोलाद उत्पादन क्षेत्रातील कंपनी सेल (स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड)आगामी काळामध्ये आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणार आहे. सदरच्या नव्या उत्पादन विस्ताराच्या योजनेअंतर्गत कंपनी पहिल्या टप्प्यामध्ये 15 दशलक्ष टन इतके उत्पादन वाढवणार असल्याची माहिती आहे. कंपनीची सध्याची पोलाद उत्पादन क्षमता 20 दशलक्ष टन वार्षिक इतकी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 35 दशलक्ष टनपर्यंत एकंदर उत्पादन क्षमता कंपनीला करायची आहे.