तुम्हाला जितक्या अधिक भाषांचे ज्ञान असेल, तितकीच स्मरणशक्ती तीव्र अन् मजबूत असणार आहे. यामुळे विस्मृतीचा आजार तुमच्यापासून तितकाच दूर राहणार आहे. जेव्हा आम्ही एक भाषा बोलता-बोलता मध्येच दुसरी भाषा बोलू लागतो, तेव्हा मेंदूचा मेमरी हब म्हणवून घेणारा हिप्पोकॅम्पस एक विशेष प्रकारच्या नियंत्रणाचे प्रदर्शन करतो असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
जर एखादा व्यक्ती हिंदी बोलत असेल आणि ऐकणाऱ्या व्यक्तीला इंग्रजी देखील समजत असल्यास तो मध्येमध्ये काही वाक्यं इंग्रजीतही बोलू लागतो. याचबरोबर घर आणि ऑफिसमध्ये आपण वेगळ्या भाषा बोलतो. अशा स्थितीत दिवसभरात ब्रेनच्या हिप्पोकॅम्पसची कसरत होत राहते. या कसरतीमुळे स्मरणशक्ती अधिक तीव्र राहण्यास मदत मिळते.
भाषा मेंदूला सक्रीय करतात, तसेच त्याला विकसित करतात. जेव्हा आपण एखादी भाषा बोलतो तेव्हा मेंदूचा मोठा हिस्सा सक्रीय होतो आणि यामुळे स्मरणशक्ती बळकट होते असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. मेंदूत दोन लँग्वेज सेंटर्स असतात. हे दोन्ही मेंदूच्या डाव्या हिस्स्यात असतात. त्यांचे काम वेगवेगळ्या भाषा समजून घेणे आहे. याचमुळे जर कधी मेंदूला ईजा झाल्यास आणि डावा हिस्सा प्रभावित झाल्यास आमच्या भाषेवर किंवा बोलण्यावर प्रभाव पडत असतो.
प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स (पीएनएएस) जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार जेव्हा एखादा व्यक्ती कुठलाही शब्द वाचत असल्यास मेंदूत दोन प्रक्रिया एकाचवेळी घडतात. विज्ञानाच्या भाषेत एका प्रक्रियेला ‘बॉटम-अप’ म्हटले जाते, ज्यामुळे मेंदू अक्षरे ओळखू शकतो आणि दुसरी प्रक्रिया ‘टॉप-डाउन’ म्हणून ओळखली जाते, ज्यात मेंदू स्मरणशक्तीच्या मदतीने या शब्दांचा अर्थ समजून घेतो. मेंदूचे लँग्वेज सेंटर जेव्हा भाषा समजून घेते, तेव्हा ते सर्व माहिती मेंदूच्या सेरेब्रल कोर्टेक्सपर्यंत पोहोचविते. यानंतर मेंदूचे मेमरी हब म्हणवून घेणारे हिप्पोकॅम्पस आणि तर्क करणारा सेरेब्रल कोर्टेक्स परस्परांमध्ये संवाद साधतात. मग मेंदूच्या विविध हिस्स्यांमधील न्यूरॉन्स परस्परांच्या माहितींची देवाणघेवाण करतात. मेमरी हब प्लॅनिंग आणि तर्क करणाऱ्या हिस्स्याकडून माहिती मिळवत त्याला स्मरणशक्तीत रुपांतरित करत असतो.
डिमेंशियाचा धोका कमी
द्विभाषिक लोक दोन भाषांदरम्यान वेगाने बदल करू शकतात, याचमुळे ते मल्टीटास्किंगमध्ये तरबेज असतात. त्यांना स्वयंनियंत्रणात अडचणी येत नाहीत. यामुळे वृद्धत्वात डिमेंशिया किंवा हॅल्युसिनेशन या समस्यांचा धोका कमी असतो असा दावा न्यूरोसायंटिस्टकडून करण्यात येतो.
निर्णय घेण्याची उत्तम क्षमता
एका अध्ययनात 59-76 वयोगटातील 746 जणांवर संशोधन करण्यात आले. यातील सुमारे 40 टक्के लोकांमध्ये स्मरणशक्तीसंबंधी कुठलीच समस्या नव्हती. तर उर्वरित लोक भ्रम किंवा स्मरणशक्ती कमी होण्याने प्रभावित होते. एक भाषा जाणणाऱ्यांच्या तुलनेत दोन भाषा जाणणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता चांगली होती.