मुंबई
: बांधकाम क्षेत्रात कार्यरत एनसीसी कंपनीचा समभाग सध्याला तेजीत दिसतो आहे. कंपनीचा समभाग शुक्रवारी शेअरबाजारात 3 टक्के वाढत बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 126 रुपयांवर कार्यरत होता. कंपनीला नवे कंत्राट प्राप्त झाले आहे. हे नवे कंत्राट 2088 कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जात आहे. 3 मे 2023 रोजी समभागाने या आधी 126 रुपयांची 52 आठवड्याची उच्चांकी गाठली होती. कॅलेंडर वर्षात पाहता समभाग जवळपास 36 टक्के इतका वाढला आहे.