डॉ. मीना चंदावरकर यांचे मत : व्हीटीयू महिला मंचतर्फे कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय स्त्राr ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सांस्कृतिक राजदूत आहे. ती आपल्या संस्कृतीची वाहक आहे, असे मत कर्नाटक विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर यांनी व्यक्त केले. व्हीटीयू महिला मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. मंगळवारी विद्यापीठात हा कार्यक्रम झाला.
त्या म्हणाल्या, आपल्याला स्त्रित्वाचा सन्मान करता आला पाहिजे. स्त्रियांचे या समाजासाठीचे योगदान मोठे आहे. आई ही पहिली गुरू आहे आणि तीच पहिली स्कॉलर म्हणजेच विद्वान आहे. महिला एकाच वेळी अनेक भूमिका निभावतात. कोरोना काळात तरी त्यांनी परिस्थितीची सर्व आव्हाने सक्षमपणे पेलली आहेत.
महिला समाजामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. मुख्य म्हणजे त्या आरोग्याची काळजी घेतात. कोरोना काळात 70 टक्क्मयांहून अधिक महिला आरोग्य सेविकांनी जीवावर उदार होऊन सेवा केली आहे. महिलांचे हे सर्व कार्य पाहता त्या शक्तीस्वरुपिनी असून आपल्या देशाच्या सांस्कृतिक राजदूत आहेत, असे डॉ. चंदावरकर यांनी नमूद केले.
याप्रसंगी कुलगुरू प्रा. करिसिद्धाप्पा यांनी अध्यक्षीय समारोप केला. कुलसचिव प्रा. ए. एस. देशपांडे यांनी स्वागत केले. प्रा. रश्मी राच्चा यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. बी. ई. रंगास्वामी यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. वित्त अधिकारी एम. ए. सपना यांनी आभार मानले.