आतापर्यंत 48 जणांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
केपीटीसीएल ज्युनिअर असिस्टंट परीक्षा घोटाळाप्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरूच ठेवली आहे. बुधवारी आणखी तिघा जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 48 वर पोहोचली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली असून डीसीआरबीचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सलग तीन दिवस अटकेची कारवाई करण्यात आली असून बुधवारी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आण्णाप्पा केंपान्ना मारवाडी (वय 31, रा. मल्लापूर पी.जी. ता. गोकाक), जॉनरॉबर्ट यशवंत बंगेण्णावर (वय 26, रा. शिवापूर, ता. गोकाक), चिदानंद चिन्नप्पा माडलगी (वय 27, रा. राजापूर, ता. मुडलगी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. या तिघा जणांनी परीक्षेत वापरलेले इलेक्ट्रीकल डिव्हाईस नष्ट केले असून पोलिसांनी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.