म्हासुर्ली प्रतिनिधी
धामणी खोऱ्यातील वेतवडे पैकी खामणेवाडी (ता.पन्हाळा) येथील अत्यंत हुशार,मनमिळावू, हसतमुख व जिद्दी, असलेल्या व कमी वयामध्ये अंगच्या हुशारीच्या जोरावर सहजपणे पोस्ट ऑफीस भरती मध्ये ब्रॅंच पोस्ट मास्तर पदाला गवसणी घातलेल्या तानाजी दिलीप पडवळ (वय-२२) यांचा मृत्यु झाला. त्याच्या अचानक जाण्याने वेतवडे – धामणी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अत्यंत हुशार व चतुर म्हणून लहानपणापासूनच त्याची ओळख असलेल्या तानाजीने हुशारीच्या जोरावर पोस्ट ऑफिस भरती परिक्षेत उर्तीण पोस्ट सेवेत नोकरी मिळवली. कमी वयात मुलाच्या हुशारीने सरकारी नोकरी लागल्याने आई-वडिलांनाही त्याचा आनंद होता. पण त्याला अचानक जास्त ताप आल्याने कोल्हापूर मधील एका खासगी रुग्णालयात गेल्या महिन्याभरा पासून उपचार सुरू होते.लाखों रुपये खर्च करून ही तानाजीने उपचारास योग्य प्रतिसाद दिला नाही.आणि अखेर शेवटी तानाजीला मृत्युने गाठलेच.
अत्यंत मनमिळावू हुशार जिद्दी खूप मोठा मित्रपरिवार असणारा तानाजी म्हणजे अनेकांच्या हृदयात कायमचं घर करून होता. पण तानाजीच्या अशा प्रकारच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.अंत्ययात्रेवेळी मोठा जनसमुदाय जमून सर्वांनी जड अंतकरणाने त्याला शेवटचा निरोप दिला.त्याच्या पश्चात आई-वडील व चार विवाहित बहिणी, चुलते,चुलतभाऊ असा मोठा परिवार आहे.