जबरी चोरी, खून, लुटमार, अंमली पदार्थ तस्करी व इतर गुह्यातील आरोपी जेरबंद
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा पोलीस दलाकडून गेल्या काही दिवसांत अनेक गंभीर स्वरूपाच्या गुह्याची उकल करण्यात आलेली आहे. जबरी चोरी, खून, लुटमार, अंमली पदार्थाची तस्करी व इतर गुह्यातील आरोपी जेरबंद करण्यात पोलीस दल आघाडीवर आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनामुळे वाढत्या गुन्हेगारी वृत्तीला आळा बसत आहे.
जिह्यातील लोणंद येथील घराबाहेर झापलेल्या युवकांचा गळा चिरून खून करण्यात आला. हा खून बहिणीबरोबर असणाऱया प्रेमसंबंधाच्या संशयावरून झाला. विसापुर येथील वृद्ध दाम्पत्याचा खून स्वतः मावस जावयाने केला. बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱयाना पकडून दोन गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस असा 1 लाख 80 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जुना मोटर स्टॅड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून 2 लाख 10 हजार 620 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 7 जणांवर कारवाई करण्यात आली. पुसेगावच्या हद्दीतून 19 लाख 50 हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. अशा अनेक घटना गेल्या काही दिवसापासून घडल्या आहेत. या घटना घडताच जिल्हा पोलीस दलाकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांच्याकडून गुह्याची उकल करण्यासाठी पोलीस कर्मचाऱयांना मार्गदर्शन करण्यात आले. तपासाची दिशा ठरवून हाती येणारे पुरावे या आधारे गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. तसेच किरकोळ चोरी, अत्याचार अशा गुह्यातील आरोपींनाही तात्काळ जेरबंद करण्यात येत आहे. यामुळे गुह्यापाठोपाठ तपास अन् आरोपी जेरबंद करण्यात जिल्हा पोलीस दलाला यश मिळत आहे.