रविवारी दुपारी येथील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकून सुमारे दहा कोटीचे दागिने लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या सहा ते सात लोकांच्या टोळीतील दोघांची देहयस्टी आणि चेहरे एका सीसीटीव्ही रेकॉर्ड वरून उघडकीस आले आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी संधी निर्माण झाली आहे.
रविवारी दुपारी या मोठ्या ब्रँडच्या शोरूम मध्ये पोलीस आहोत असे सांगून घुसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने कर्मचाऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून एकत्र बोलावून बांधून घातले आणि सर्व दागिने घेऊन पोबारा केला होता. प्राथमिक तपासामध्ये हे दागिने आणि हिऱे असा दहा कोटीचा ऐवज असावा अशी माहिती पुढे आली आहे. अद्याप फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे. दरोडेखोरांनी जाताना दागिन्याबरोबरच शोरूम मधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुद्धा पळून गेल्याने तपासात अडथळे येत होते मात्र रिलायन्स कंपनीच्या सेंट्रल सीसीटीव्हीमध्ये दोन संशयतांची देह एस्टी आणि चेहरेपट्टी उघडकीस आली आहे. या गुन्हेगारांनी चेहऱ्यावर मास्क किंवा डोळ्यावर गॉगल, डोक्यावर टोपी परिधान करून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला असला तरीही पोलिसांना तपासाच्या दृष्टीने मिळालेली ही छायाचित्रे उपयुक्त ठरतील असे दिसत आहे