वार्ताहर/ कुडाळ
कुडाळ तालुक्यातील तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रौउत्सव २६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांवस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 8 वाजता धार्मिक विधी, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ओटी भरणी कार्यक्रम, रात्री 11 वाजता पालखी सोहळा, 12 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रवळनाथ पंचायत सल्लागार उपसमितीने केले आहे.