साडेसात लाखांचे दागिने पळविले : ढवळी फोंडा येथे भरदिवसा वाटमारी
फोंडा : पोलीस असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी भररस्त्यात एका महिलेच्या अंगावरील सुमारे 7 लाख 50 हजारांचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ढवळी बगलरस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लुबाडली गेलेली महिला दुर्भाट येथील असून या प्रकाराबद्दल तिने फोंडा पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. ही घटना सोमवार 29 रोजी दुपारी 1 वा. सुमारास ढवळी बगलरस्त्यावरील श्रीसत्यनारायण मंदिरजवळील उ•ाणपुलावर घडली.
लग्नाला जात होती महिला
प्राप्त माहितीनुसार ही महिला आपल्या स्कूटरवऊन बोरी येथे लग्न समारंभाला निघाली होती. ढवळी बगलरस्त्यावर पोहोचली असता तिच्या पाठिमागून सफेद रंगाच्या बुलेटवऊन आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी तिला थांबण्यास सांगितले.
दागिने घालून प्रवास करणे योग्य नव्हे
आपण पोलीस असून अशा प्रकारे अंगावर मौल्यवान दागिने घालून प्रवास करणे धोक्याचे आहे. तुला वाटेत पोलिसांनी शिट्टी वाजवून थांबण्याचा इशारा केला होता. पण तू थांबली नाहीस. त्यामुळे तुला सतर्क करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे त्या भामट्यांनी तिला सांगितले. वाटेत पुढेही तुला पोलीस भेटतील. त्यामुळे आताच अंगावरील सर्व दागिने काढून स्कूटरच्या डिकीत ठेव असे तिला सांगितले.
डिकीत ठेवायला सांगितले सोने
त्यांच्या बोलण्यावऊन संभ्रमीत झालेल्या त्या महिलेला काहीसा संशय आला खरा, पण त्याचवेळी त्यांना सामील असलेला आणखी एक भामटा रस्त्याने चालत तेथे आला. आपण बाजारातून आताच आलोय. वाटेत आपल्यालाही पोलीस भेटल्याचा बहाणा कऊन त्याने आपल्या गळ्यातील जाड सोनसाखळी काढून हातातील बॅगेत ठेवली. या प्रकारामुळे सदर महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला व तिने गळ्यातील मंगळसूत्र, लॉकेट तसेच हातातील दोन तोडे ऊमालात गुंडाळले. तिची ही कृती पाहून कपड्यात दागिने सुरक्षित राहणार नाहीत असा बनाव करीत तिच्या हातात एक कागद दिला व त्या कागदात दागिने गुंडाळण्यास सांगितले. तिने कागदात दागिने गुंडाळून स्कूटरच्या डिकीत ठेवले. यावेळी तिला बोलण्यात गुंतवून ठेवत तशाच प्रकारची आणखी एक कागदाची पुडी डिकीत ठेऊन नकळत तिची अदलाबदल करण्यात आली.
डिकीतील पुडीत सापडले दगड
या महिलेला काहीही कळण्यापूर्वी तिघेही भामटे तेथून पसार झाले. थोड्यावेळाने तिने डिकीतील कागदाची पुडी उघडली तेव्हा त्यात दोन बनावट बांगड्या व काही छोटे दगड होते. आपली लुबाडणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तात्काळ फोंडा पोलीस स्टेशन गाठले व घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार नोंदविली. सदर महिलेने आपल्या जबानीत तिघा चोरट्यांपैकी एकजण कोकणीत बोलत असल्याचे सांगितले आहे. तसेच सदर घटनेबद्दल सविस्तर माहिती पोलिसांना दिली आहे.