पेणजवळ पहाटेची थरारक घटना, 82 लाखांचे दागिने लंपास
प्रतिनिधी / दापोली
दापोलीतून बोलेरो गाडीतून बोरिवलीकडे निघालेल्या दापोलीतील मोहिते कुटुंबाला रायगड जिह्यात पेणजनजीक आंबिवली गावाजवळ अंगावरील सुमारे 82 लाखांचे दागिने हिसकावून लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याबाबत दादरी सागरी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
दापोली-पाचवली येथील प्रशांत मोहिते यांचे कुटुंब बोलेरो गाडीने दापोली बोरिवलीकडे प्रवास करत होते. सोमवारी पहाटे पावणेतीन वाजता आंबिवली येथील साई सहारा हॉटेलजवळ आले असता तीन गाड्यांमधून आलेल्या लुटारूंनी त्यांना लाकडी दांडक्याने व हाताच्या बुक्क्यानी मारहाण करत त्यांच्या अंगावरील 15 तोळे सोन्याचे दागिने लुटले. तसेच प्रशांत मोहिते यांची बहीण श्रेया सावंत हिचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
15 तोळ्यांचे दागिने हिसकावले
या घटनेत लुटलेल्या 15 तोळे दागिन्यांची दागिन्यांची बाजार भावाने किमत 82 लाख ऊपयांपेक्षा अधिक आहे. मात्र दादरी पोलीस स्थानकात दागिने खरेदी करण्यावेळीची 4 लाख 50 हजार रूपये ही किमत नोंदवण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामयार्ग हा रात्रीच्या प्रवासाला सुरक्षित महामार्ग मानला जात असताना या प्रकारामुळे या महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी दादरी पोलीस स्थानकात भादंवि कलम 395, 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.