The fasting of the oral villagers temporarily postponed
रस्त्यासाठी निधी प्राप्तीचे पत्र मिळाल्यानंतर उपोषण घेतले मागे
तोंडवळी येथील रस्त्याबाबत तोंडवळीवासियांनी सुरु केलेले उपोषण गुरुवारी दुसरया दिवशी आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून 20 लाख मंजूरीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी दुपारी उपोषणस्थळी सरपंच नेहा तोंडवळकर यांना दिल्यानंतर तोंडवळी वासियांनी उपोषण पुढील तीन महिन्यासाठी तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याबाबत रस्त्याकामात दिरंगाई झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर,यांनी रस्त्याच्या मानाने निधी अपुरा असलातरी आवश्यकता भासल्यास आमदार वैभव नाईक यांच्या मार्फत निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन यावेळी दिले.यावेळी बाबी जोगी,वासुदेव पाटील, आबा कांदळकर, दिपक कांदळकर,उपसरपंच हर्षद पाटील, संजय केळूस्कर,गणेश तोंडवळकर यांसह अन्य महिला, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
आचरा प्रतिनिधी