सावंतवाडी प्रतिनिधी
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अमली पदार्थ विरोधात मोहीम हाती घेतली. त्यात सावंतवाडीत कोलगाव येथे दोन युवकांना रंगेहात पकडण्यात आले होते. तर अन्य दोघेजण पळून गेले होते, मात्र पळून गेलेले दोघेजण कुडाळ येथे ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे सावंतवाडीत गांजा पार्टी मधील अन्य काही जणांचा शोध सुरूआहे. पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे.