युक्रेन अध्यक्षांशी फ्रान्सचे अध्यक्ष अन् जर्मन चान्सलरसोबत चर्चा : लढाऊ विमानांची केली मागणी
वृत्तसंस्था / पॅरिस
ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतल्यावर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेंस्की हे बुधवारी रात्री उशिरा ब्रिटनच्या विमानाद्वारे फ्रान्समध्ये पोहोचले. फ्रान्समध्ये त्यांनी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चान्सलर ओलाफ शोल्ज यांची भेट घेतली आहे. झेलेंस्की यांनी रशियासमोर आव्हान निर्माण करण्यासाठी फ्रान्स आणि जर्मनीकडून लवकरात लवकर लढाऊ विमाने आणि मोठी शस्त्रास्त्रs पुरविण्यात यावीत असा आग्रह धरला आहे.
विजय, शांतता, युरोप आणि लोकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी फ्रान्स युक्रेनसोबत आहे. आम्ही युक्रेनला मदत पोहोचविण्याचे आमचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. युक्रेनमध्ये पूर्ण युरोपचे भवितव्य पणाला लागले आहे. रशिया जिंकू शकत नाही आणि तो जिंकताही कामा नये असे उद्गार अध्यक्ष मॅक्रॉन यांनी काढले आहेत.
युक्रेन युरोपीय परिवाराचा हिस्सा
युक्रेन हा युरोपीय परिवाराचा हिस्सा आहे. जर्मनीने आतापर्यंत युक्रेनला आर्थिक मदत करण्यासह शस्त्रास्त्रs आणि मानवी सहाय्य पोहोचविले आहे. जोपर्यंत गरज भासेल तोपर्यंत आम्ही युक्रेनसोबत ठामपणे उभे राहू असे जर्मन चान्सलर शोल्ज यांनी म्हटले आहे.
मॅक्रॉन यांच्या भूमिकेवरून मतभेद
प्रेंच प्रसारमाध्यमांनुसार झेलेंस्की हे अनेकवेळा युद्ध तसेच युक्रेनबद्दल अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या प्रतिक्रियेवरून त्रस्त दिसून आले आहेत. मॅक्रॉन यांनी युद्ध सुरू झाल्यावर अनेकदा रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. तसेच युद्ध रोखण्यासाठी कुठल्याही अंतिम तडजोडीत रशियाच्या हितांची काळजी घेण्यावरून चिंता व्यक्त केली होती. परंतु मॅक्रीन यांनी मागील काही महिन्यांमध्ये फ्रान्स युद्धात विजयावरून सर्वप्रकारे युक्रेनसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. युक्रेनला रणगाडय़ांसह 12 नवी सीजर हॉवित्झर आर्टिलरी सिस्टीम देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच युक्रेनला लढाऊ विमाने पुरविण्याच्या शक्यतेला त्यांनी नाकारलेले नाही.
जर्मनीच्या रणगाडय़ांची पहिली तुकडी पोहोचणार
दुसरीकडे जर्मनीने देखील युक्रेनला लेपर्ड रणगाडे पुरविण्याची घोषणा केली आहे. रणगाडय़ांची पहिली तुकडी एप्रिलपर्यंत कीव्हमध्ये पोहोचणार असलयाचे जर्मनीचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. तर अमेरिका आणि ब्रिटनने देखील अनेक रणगाडे तसेच शस्त्रास्त्रs युपेनमध्ये पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.
ब्रिटनचे मानले आभार
यापूर्वी झेलेंस्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली होती. सुनक यांनी विमानतळावर जात झेलेंस्की यांचे स्वागत केले होते. झेलेंस्की यांनी या दौऱयात ब्रिटनच्या संसदेला संबोधित केले होते. युक्रेनच्या युद्धनायकांच्या वतीने त्यांनी ब्रिटनच्या लोकांचे आभार मानले. तसेच बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजे चार्ल्स यांची त्यांनी भेट घेतली होती.